शहरातील प्रताप नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या 'उर्वशी बार' मध्ये घुसून धुमाकूळ घालणाऱ्या आणि बारमालकाला गंभीर मारहाण करणाऱ्या १० आरोपींच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून शस्त्रे, वाहने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी उर्वशी बारमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून बारमालक हरीशंकर राय यांना लक्ष केले.