चंद्रपूर: नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा शुभारंभ
वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहचून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय सेवांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आज दि 17 सप्टेंबर ला 1 वाजता आयोजित ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.