कोरेगाव: कोरेगाव पोलिसांची कामगिरी; दुचाकी चोरट्याला दौंड तालुक्यातून केली अटक : सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले
चिमणगाव, ता. येथील शेतकरी नवनाथ विष्णू गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी चोरून नेणाऱ्या राजेंद्र छोटू सोनवणे वय ३७ या संशयिताला कोरेगाव पोलिसांनी दौंड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी रविवारी दुपारी चार वाजता याबाबतची माहिती दिली. नवनाथ विष्णू गायकवाड हे चिमणगांव येथील शेतकरी असून साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी व वाहतुकीचा त्यांचा व्यवसाय आहे.