शेगाव: घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आळसणा रोडवरील सरस्वती नगर येथे घडली
घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८:३० वाजे दरम्यान आळसणा रोडवरील सरस्वतीनगरात घडली. याबाबत गजानन समाधान अढाव यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,घरासमोर दुचाकी (क्र. एमएच २८ बीएच ५९९६) किंमत अंदाजे ४० हजार रुपये उभी केली होती. सदर दुचाकी ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३८० BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.