मोहाडी: पांजरा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची धाड, आरोपीविरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील पांजरा येथे दि. 16 ऑक्टोंबर रोज गुरुवारला सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार दत्तात्रय कमळे हे गस्तीवर असताना त्यांना पांजरा येथे एका विनाक्रमाच्या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना एक ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर ट्रॅक्टरवर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी राजू डाकरे व महेश जगनाडे दोन्ही रा. पांजरा यांच्याविरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.