हिंगोली: शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी आत्महत्यांवर उपाय म्हणून वारकरी साहित्य परिषद पुढे सरसावली
राज्यात वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर वारकरी साहित्य परिषदेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना मानसिक आधार आणि मार्गदर्शन देण्यासाठी ‘ज्ञानोबा दिंडी’ ही विशेष दिंडी हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे दाखल होणार आहे. या उपक्रमातून संत विचारांच्या आधारे शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.