सेनगाव: लिंबाळा तांडा-तांदुळवाडी रस्त्यावर महसूल पथकाची धडक कारवाई,अडीच ब्रॉस रेतीसह टिप्पर जप्त,दोघांवर गुन्हा दाखल
महसूल पथकाच्या वतीने धडक कारवाई करून अडीच ब्राॅस रेतीसह टिप्पर पकडून सेनगांव पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लिंबाळा तांडा ते तांदूळवाडी रस्त्यावर करण्यात आली. आरोपींनी संगणमत करून विनापरवाना,बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना सदर ठिकाणी महसूल पथकाला आढळून आल्याने या प्रकरणी फिर्यादी विनोद गादेकर मंडळ अधिकारी आजेगांव यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.