किनवट: माझ्यासोबत लग्न का करत नाहीस म्हणून पाटोदा येथील महिलेचा आरोपीने केला खून आरोपी विरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kinwat, Nanded | Oct 26, 2025 दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी रात्री एकच्या दरम्यान पाटोदा ता. किनवट जि. नांदेड येथे, यातील मयत मंगल कोंडीबा धुमाळे, वय 45 वर्षे, रा. पाटोदा ता. किनवट हिस आरोपी कृष्णा गणेश जाधव, वय 35 वर्षे, रा. पाटोदा ता. किनवट याने महिलेसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे माझे सोबत लग्न का करत नाहीस असे म्हणून मारहान करून खुन केला. फिर्यादी दत्ता कोंडीबा धुमाळे, वय 49 वर्षे, रा. पाटोदा खु. ता. किनवट यांनी दिलेल्या फिर्यादवरुन किनवट पोलीस स्टेशन मध्ये आरोपी कृष्णा जाधव विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल.आरोपी फरार