वर्धा: 15 जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन,शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना व नागरिकांनी सहभाग नोंदवावा
भारतीय ऑलिंपिक पदक विजेते स्व. खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जयंती निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने 15 जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना व नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.