तळा: तालुक्यात ३३ वर्षीय व्यक्तीने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Tala, Raigad | Apr 17, 2025 तळा तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 33 वर्षीय तरुणाने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीडित अल्पवयीन मुलीस उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.