जिल्ह्यातील संपुर्ण देवळी व हिंगणघाट, वर्धा, पुलगाव या नगर परिषदेच्या काही सदस्यपदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्यादृष्टीने मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडी बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.