नागपूर शहर: नरेंद्र नगर ओवर ब्रिजच्या खाली रेल्वेच्या धडकेत 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; पोलिसांचा तपास सुरू
एक डिसेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतील नरेंद्र नगर ओव्हर ब्रिजच्या खाली रेल्वे लाईन वर रेल्वेच्या धडकेत मुंगली खमारी यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की त्यांनी आत्महत्या केली याप्रकरणी तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत तूर्तास पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे