पाचोरा: स्व. तात्यासाहेब आर.ओ. पाटील, व्यापारी भवण येथे पाचोरा पंचायत समिती गणननिहाय आरक्षण सोडत जाहीर,
आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता पाचोरा शहरातील स्व. तात्यासाहेब आर.ओ. पाटील, व्यापारी भवण येथे भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार पंचायत समितीचे निर्वाचक गणनिहाय आरक्षण सोडतीने (चिठ्ठया टाकून) निश्चित करण्यात आली.