कळमनूरी: येडशी तांडा येथील आश्रम शाळेच्या वस्तीगृहात विद्यार्थिनीचा विनयभंग,आखाडा बाळापूर पोलिसात दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील आश्रम शाळेवर दिनांक 13 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वस्तीगृहाची देखरेख करणाऱ्या शिक्षकांने एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आज दिनांक 15 ऑक्टोबर तीन वा . सुमारास दोन शिक्षकांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक संरक्षण कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .