नंदुरबार: राकसवाडे गावातून लालसिंग वळवी यांच्या घरासमोरून मोटरसायकलची चोरी
नंदुरबार तालुक्यातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील राकसवाडे गावातून लालसिंग वळवी यांच्या घरासमोरून त्यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच 39 ए एफ 7987 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी उपनगर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.