अकोला : शहर वाहतूक नियंत्रण शाखेने नो पार्किंग आणि रस्त्यावर उभ्या वाहनांवर विशेष मोहिम राबवून ११२ वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेत ५५,००० दंड आकारण्यात आला असून ७,५०० वसूल झाले आहेत. तसेच चारचाकींवर जॅमर लावून कारवाई सुरू असून, कमांड कंट्रोल रूममधून ४५ चौकांवरील सीसीटीव्हीद्वारे वाहतूक नियमभंगावर ऑनलाईन चलान जारी करण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. ही माहिती पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी ६ नोव्हेंबर रोजी सायं. ६ वाजता प्रसिद्धीपत