नगर: डिजिटल अरे च्या माध्यमातून डॉक्टरांची सात कोटींची फसवणूक सर्वोच्च न्यायालय आणि ईडीच्या नावे पाठवली बनावट कागदपत्रे
सायबर गुन्हेगारांनी डिजिटल आर एस च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल सात कोटी 17 लाख 25 हजार रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालय आणि पोलीस अधिकाऱ्यांना नावाने बनावट कागदपत्रे पाठवून डॉक्टरांना घाबरवले आणि वेळोवेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम हस्तांतरित करून घेतली या प्रकरणी डॉक्टरनी 13 ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिरत दिली असून विविध मोबाईल क्रमांक आणि खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे