सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 29, 2025 दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पांढऱ्या रंगाच्या सालचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे सावनेर पोलीस नमूद वाहनाचा शोध घेत असताना मौजा मानकर पेट्रोल पंप जवळ वाहनाचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस तात्काळ सदर घटनास्थळ पोहचून नमूद वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये सात लाख 11 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे