तेल्हारा: अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र मतदार संघ द्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते गवई यांचे निवेदन
Telhara, Akola | Sep 14, 2025 अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करार केला होता मात्र महात्मा गांधी यांनी तो पूर्ण होऊ दिला नाही. सध्या अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या अनेक समस्या या तशाच असून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे त्या पक्षाचे काम करतात मात्र समाजाचे काम करत नाही त्यामुळे अनुसूचित जाती जमाती त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावा या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते गवई यांनी निवेदन देऊन मागणी केली.