नांदेड: आमचं ताट सुरक्षित आहे, पण कोणी घुसू नये म्हणून आदिवासी बांधवाचा मोर्चा - आमदार भीमराव केराम विश्रामग्रह येथे म्हणाले
Nanded, Nanded | Oct 5, 2025 आमचं ताट सुरक्षित आहे, पण कोणी घुसू नये म्हणून आदिवासी समाजाचा मोर्चा काढत आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी दिली. एसटी प्रवर्गात कोणत्या ही जातीला समावेश करू नये यासाठी उद्या नांदेडमध्ये मुळ आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आरक्षणची मागणी करने हे मूळ आदिवासी समाजावर अन्याय असल्याचे आमदार केराम म्हणाले.