जालना: जालना शहरातील नाथनगरमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला; नागरिकांच्या सतर्कतेने आरोपी पकडला
Jalna, Jalna | Apr 3, 2026 जालना शहरातील नाथनगर परिसरात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीस पकडण्यात यश आले आहे. शुक्रवार दि. 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे. फिर्यादी कैलास मंघनदास सचदेव, रा. नाथनगर, एसआरपीएफ कॅम्पजवळ, जालना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घरी झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या गेटचा आवाज आला. संशय आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता एक इसम दिसला.