नागपूर ग्रामीण: वाठोडा पोलिसांची तत्परता: संदलमध्ये हरवलेला १२ वर्षीय मुलगा चार तासांत सुखरूप परत
वाठोडा पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत संदलमध्ये हरवलेल्या १२ वर्षीय मुलाचा अवघ्या काही तासांत शोध लावून त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.१५ एप्रिल रोजी घरून निघून गेलेल्या एका मुलाबाबत त्याच्या आईने १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६:१५ वाजता वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगा ताजबाग येथील एका संदलसोबत कन्हान हद्दीतील 'अम्मा का दर्गा' येथे गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.