नागपूर शहर: नवी वस्ती सदर मागील रेल्वे ट्रॅक वर रेल्वेच्या धडकेत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू
11 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सदर हद्दीतील नवी वस्ती सदर मागील रेल्वे ट्रॅक वर पस्तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीच्या रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे ट्रॅकमॅन देवकरण मिश्रा यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन सदर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.