भद्रावती: आजारपणाला कंटाळून इसमिची विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या.
दुधाळा परीसरातील घटना.
आजारपणाला कंटाळून एका अटोचालक इसमाने विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० रोज शुक्रवारला रात्रो १० वाजताच्या सुमारास शहरातील दुधाळा परीसरातील एका विहिरीत घडली.छगन डोमेश्वर बुरडकर,वय ४७ वर्षे, राहणार बगडे वाडी असे या आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.