हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव यांनी 29 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याची लगड व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव यांनी दिली आहे.