राजुरा विधानसभा क्षेत्रातील कुकुडसाथ येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज (दि.२४) नोव्हेंबर ला ५ वाजता राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये स्वप्निल काकडे, रमेश ठोंबरे,विनोद उपरे, रवींद्र आस्कर आदींचा समावेश आहे.