भोकरदन: शहरातील महात्मा फुले चौकात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही,मात्र ट्रकचे मोठे नुकसान
आज दिनांक 29 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौकामध्ये मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, अपघात शहरातील सर्वात गजबजलेल्या महात्मा फुले चौकात झाला असून हा ट्रक सिल्लोड वरून भोकरदन जालना जात होता त्यावेळी शहरात हा अपघात झाला आहे , हा ट्रक थेट डिव्हायडर वर जाऊन धडकला सुदैवाने या ठिकाणी आपले इतर वाहन किंवा व्यक्ती नसल्यामुळे पुढील अनर्थ टाळला असं मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.