भोकरदन: हसनाबाद येथे गिरजा नदी पात्रातून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू, व्हिडीओ समोर
आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे असलेल्या गिरजा नदीपात्रातून दिवसा ढवळ्या जेसीबी व हायवेच्या साह्याने अवैध वाळूचा सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे आणि हा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ काल दिनांक 12 जून 2026 रोजी चा असून एकीकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी इतर ठिकाणी रेती उपसा करणाऱ्यावर कारवाई करत आहे, तर मग यांच्यावर कधी ?? असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.