एड्स बाधितांसाठी भारतातील पहिला निवासी पुनर्वसन प्रकल्प उभारताना ध्येय व्यापारातील महिला बालकांचा क्रूर वापर थांबवताना पर्यावरणापासून मानसिक आरोग्यापर्यंत 27 अभिनव सेवा प्रकल्प उभारताना झपाटलेल्या तरुणाईने स्नेहालयाचा झेंडा उंचावत असामान्य धाडस आणि कल्पकता दाखवली या झंजावाती आणि प्रेरक वाटचालीचा वास्तवदर्शी वेद स्मिता देशमुख भास्कर यांनी अगेन्स डाकनेस या पुस्तकात घेतला त्याचा सुनंदा सदाशिव अमरापुरकर यांनी केलेला सरस मराठी अनुवाद म्हणजे फिटे अंधाराचे जाळे हे पुस्तक आहे