जालना: विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची जालना येथील विविध विकास कामाना भेट; मुलभुत सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना
Jalna, Jalna | May 9, 2026 विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे जालना दौर्यावर आले असता, त्यांनी जालना शहरातील विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. शनिवार दि. 9 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मोतीबाग येथील नवीन चौपाटी सुशोभीकरणाच्या कामास भेट देवून पाहणी केली. तसेच सुपर फिप्टी उपक्रमास भेट देवून संबंधीताकडून सदर उपक्रमाची माहिती जाणुन घेतली. यांनतर जालना ड्रायपोर्टला भेट देवून पाहणी करत, ड्रायपोर्ट कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा