अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, भंडारा तालुक्यातील नादोरा टोली येथील नाल्याच्या बंधाऱ्यावर गांजाचे सेवन व साठा करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. प्रतिक अरविंद हेडाऊ (१९, रा. राममंदिर वार्ड, भंडारा) आणि प्रणय योगीराज मेश्राम (२०, रा. साकोली) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता, हे दोन्ही तरुण नशेत मिळून आले. त्यांच्याकडून ३०० रुपये किमतीचा १५ ग्रॅम गांजा, ओढण्यासाठी..