माढेळी–नागरी रोडवरील वाहतूक आज दि 27 ऑक्टोबर ला 12 वाजता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. उखर्डा येथील ओमसाईराम स्टील्स अँड अलॉयज प्रा. लि. कंपनीकडे बाहेरून कोळसा आणणाऱ्या 18 चाकी वाहनांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असुन आज वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे संबंधित विभागाने नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.