दिग्रस: शहरातील श्रीकृष्ण टॉकीज परिसरात नियमबाह्य फटाका मार्केट, महसूल विभागाने केली दुकानाची पाहणी, लवकरच होणार कारवाई
दिग्रस शहरातील श्रीकृष्ण टॉकीज जवळील परिसरात दिवाळी निमित्ताने तात्पुरता फटाका मार्केट उभारण्यात आले असून या ठिकाणी तब्बल १८ दुकाने उभारण्यात आली आहेत. परंतु हे मार्केट शहराच्या मध्यवस्तीत नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मार्केट परिसरात अग्निशमन वाहन उपलब्ध नाही, तसेच बहुतेक दुकानांमध्ये अग्निशमन उपकरणांचा अभाव आहे. काही दुकानदारांनी अग्निशमन प्रशिक्षणदेखील घेतलेले नाही. आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी आवश्यक वाळू, पाणी, बकेट आदींची व्यवस्था नाही,