दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी शीतल राकेश सोनवणे (वय ४१, रा. पिंप्राळा) यांची ५५ हजार रुपये किमतीची सोनपोत ओढून नेली. ही घटना बुधवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजत बजरंग बोगद्याजवळ घडली. या प्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.