महामार्गावरुन भरधाव कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने गेली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या चार वाहनांना धडक देत त्या वाहनांवरील चार वाहन चालक गंभीर जखमी केले. ही घटना साकेगावजवळील वाघुर नदीच्या पुलाजवळ घडली. याप्रकरणी शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कार चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.