13 जानेवारीला सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार बजाज नगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घेराव करून दंतेश्वरी वस्तीत हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव प्रमोद भुरे असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून 500 रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.