जालना: मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका तासातच आरोपी शोधला
Jalna, Jalna | Apr 4, 2026 जालना शहरातील मंमादेवीनगर परिसरातील श्री समर्थ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात जेरबंद करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. शनिवार दि. 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक गुन्हे शाखेने ही माहिती दिली. फिर्यादी संभाजी गणेश एलगंडे रा. मंमादेवीनगर, अंबड रोड, जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 2 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 ते दि. 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 या दरम्यान अज्ञात इसमाने चोरी केली.