पारोळा: मंगरूळ प्रेमियर लिग भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धा चे आयोजन
मंगरूळ प्रेमियर लिग तर्फे दरवर्षी भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात येते. पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथे यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचे भाविक पाटील व त्याचा टिमकडुन आयोजन करण्यात आले आहे. आज या स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी अशोक पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शेतकी संघाचे संचालक बबलुदादा पाटील, पाटील हॉस्पिटलचे संचालक डॉ.संकेत खरे, संजय चौधरी, योगेश पाटील यांचेसह आयोजक, खेळाडु संघ कबड्डी प्रेमी उपस्थित होते.