कल्याण: डोंबिवलीत शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, दोन गटात तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल
Kalyan, Thane | Nov 30, 2025 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका सुरुवात होऊन भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद होत आहेत आणि एकमेकांना भिडत आहेत. अशीच घटना डोंबिवलीत देखील घडली आहे. बॅनर वरून वाद झाला आणि शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करून तुफान र*** केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी प्रसंग उदाहरण दाखल परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.