आजनी मार्गावरील नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, बुधवारी संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा आंदोलन केले. डम्पिंग यार्डला लागणारी आग, पसरणारा विषारी धूर आणि रस्त्यापर्यंत आलेला कचरा यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डम्पिंग यार्डमधील आगीमुळे रामगड, आजनी आणि छावणी परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास होत आहे.