गोंदिया: खासदार प्रफुल पटेल यांनी बाहेकर हॉस्पीटल,येथे भरती असलेले तिरोडा वि.सभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांची घेतली भेट
Gondiya, Gondia | Oct 19, 2025 खासदार श्री प्रफुल पटेल यांनी बाहेकर हॉस्पीटल, गोंदिया येथे भरती असलेले तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजय रहांगडाले यांची आस्थेने विचारपूस केली व कुटुंबीयांसोबत तब्येतीविषयी चर्चा करून लवकर उत्तम स्वास्थ लाभो अश्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, डॉ अनुराग बाहेकर, दुर्गा प्रसाद ठाकरे व अन्य उपस्थित होते.