जालना: जेष्ठ नागरीकांना लुटण्याच्या घटनेत वाढ; गुरुबच्चन चौकात सोन्याची अंगठी लंपास; अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 10, 2026 जालना शहरातील गुरुबच्चन चौक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चलाखीने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. रविवार दि. 10 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अनोळखी चोरट्याचा शोध सुरू आहे. जेष्ठ नागरीकांना लुटण्याच्या घटनेत वाढ होत असून लुटमार करणार्यांना पोलीस अद्याप अटक करु शकलेली नाही. व्यंकटेशनगर येथील रहिवासी जगन्नाथ विठोबा उन्हाळे यांना लुटले.