सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील मोठी उमरी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी पाईपाने मारहाण झाल्याची घटना घडली. फिर्यादी शुभम मेहसरे यांच्या तक्रारीनुसार आरोपी आदित्य देशमुख व तीन अनोळखी इसमांनी संगम ग्राउंड येथे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती दिनांक 14 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता मिळाली