औसा: औसा एमआयडीसीतील उद्योजकांसोबत आमदार अभिमन्यू पवार यांची बैठक; औद्योगिक प्रगतीसाठी ठोस निर्णय
Ausa, Latur | Oct 31, 2025 औसा- औसा एमआयडीसीतील उद्योजक व प्लॉटधारक यांच्यासोबत आमदार अभिमन्यू पवार यांची आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी राष्ट्रीय महामार्गावरून एमआयडीसी क्षेत्रात येण्यासाठी असलेला एकच रस्ता, अंतर्गत रस्त्यांची ढासळलेली स्थिती, नाल्यांची स्वच्छता, पथदिवे बंद असणे, दर मंगळवारी जाणारी वीज, तसेच मद्यपींच्या त्रासाबाबतचे प्रश्न मांडले.यातील काही महत्त्वाच्या विषयांबाबत बैठकीदरम्यानच निर्णय घेण्यात आला.