जालना: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवली येथे वंचित बहुजन आघाडी कडून विनम्र अभिवादन
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जालना जिल्ह्यातील सेवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा व आदर्श शासन व्यवस्थेचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश खरात, रामदास स