सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरुणीचा अवघ्या सात दिवसांत पोलिसांनी शोध लावला आहे. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने ही तरुणी पंजाब राज्यातून सुखरूप ताब्यात घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून सिव्हील लाईन पोलिसांच्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.अशी माहिती दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सिव्हिल लाईन पोलिसांकडून प्राप्त झाली