तरसोद फाट्याजवळ भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने कट मारल्याने झालेल्या अपघातात तरूणासह त्याचे आईवडील हे जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.