पालघर: खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी वसई येथे भाजप जनसंपर्क कार्यालयास दिली भेट पदाधिकारी कार्यकर्त्यांशी साधला संवाद
पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी वसई, वालीव येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करत संवाद साधला. पक्ष बांधणी, संघटना बांधणी आदींबाबत खासदारांनी यावेळी मार्गदर्शन केले. भाजपचे वसई विरार परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.