इमारत सोयीसुविधा युक्त आणि सुसज्ज असली तरी शेवटच्या घटकाचा विचार करून न्यायदान करणे, हेच आपले कर्तव्य आहे, असे विचार मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी व्यक्त केले.बल्लारपूर येथे आज दि 16 नोव्हेंबर ला 12 वाजता दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.