पनवेल: पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर केले चाकूने वार, पत्नी गंभीर जखमी
Panvel, Raigad | Nov 10, 2025 पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूच्या सहाय्याने वार केल्याप्रकरणी पती विरोधात आठ नोव्हेंबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीस वर्षीय महिला पनवेल तालुक्यातील गावात राहत असून त्यांच्या पतीला दारू पिण्याचे व गांजा ओढण्याचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. सात नोव्हेंबर रोजी त्यांचे पती घरी आले आणि पत्नीचे परपुरुषासोबत लफडे आहे असे बोलूनचाकूने छातीवर, डाव्या हातावर वार केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली.